खेड : तालुक्यातील कोतवली येथील मांडवकरवाडीमध्ये केदार वाघजाई झोलाई कालकाई ग्रामदेवतेच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामदेवतेच्या आगमनासाठी वाडीत विशेष सजावट करण्यात आली होती.
पालखी वाडीत दाखल होताच ढोल-ताशांचा गजर, लेझीमच्या तालावर थिरकणारे युवक आणि पारंपारिक नृत्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.
ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणि देवीच्या नावाच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले. शिवाजी आणि देवीच्या आगमनाचा एकच जल्लोष पाहायला मिळत होता.
या सोहळ्यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामदैवताविषयी असलेली श्रद्धा आणि पारंपारिक संस्कृतीचे जतन यामुळे हा स्वागत सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻