शिरगाव ( ता चिपळूण ) : महाराष्ट्रमधील प्रसिद्ध देवस्थान आई महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त कुंभार्ली येथे महाकाली नवतरुण क्रीडा मंडळाच्या कब्बडी स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली तर शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी आई महाकाली देवीच्या यात्रेला बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे यावेळी दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत
शिरगाव कुंभार्ली पोफळी तीन गावचे जागृत देवस्थान आई सुकाई वरदायिनी महाकाली देवीची यात्रा 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.गेली 38 वर्ष कुंभार्ली येथील महाकाली नवतरुण क्रीडा मंडळ यात्रेनिमित्त कब्बडी स्पर्धा घेऊन खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देतात त्याप्रमाणे याहीवर्षी भव्य स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उद्घाटन समारंभाला कुंभार्ली उपसरपंच संदीप कोलगे, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे, ज्येष्ठ गायक श्रीराम पवार, सामाजिक कार्यकर्ते किसन पवार, युवा नेते वैभव पवार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, तंटामुक्त अध्यक्ष अजित लाड,माजी तंटामुक्त अध्यक्ष गणेश कोलगे,उद्योजक गौरेश कोलगे, माजी उपसरपंच दिनेश लब्धे, प्रशांत कोलगे बाळू जाधव, अजिंक्य कोलगे, सुरेश अण्णा शिंदे,आप्पा गुरव ,नाना गुरव, मंगेश गुरव, आत्माराम गुरव , नंदू शिंदे आदीसह मान्यवर उपस्थित होते.तर बक्षीस वितरण समारंभाला दिग्गज मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत यावर्षी स्पर्धेत फ्रिज,सायकल सह आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत त्यामुळे याहीवर्षीच्या स्पर्धेचं राज्यभरात कौतुक होत आहे तर स्पर्धेधे निवेदन अजिंक्य कोलगे व अशोक लांबे करीत आहेत..

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY