लांजा तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल २७ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक राज सुरू झाले असून एका विस्तार अधिकाऱ्याकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना एकाच वेळी अनेक ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.
तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींची मुदत ९ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. तर मठ, भडे, कुरंग आणि शिपोशी या चार ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली होती. त्यामुळे एकूण २७ ग्रामपंचायती सध्या लोकप्रतिनिधीविना झाल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला नसल्याने पंचायत समिती प्रशासनामार्फत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इसवली, विलवडे, बेनी खुर्द, साटवली, कोलेवाडी, आसगे, इंदवटी, पालू, वाडगाव, वाघणगाव, आंजणारी, भांबेड, हर्दखळे, खोरनिनको, वनगुळे, कणगवली, माजळ, पन्हळे, आडवली, गोळवशी, जावडे, विवली केळंबे आणि रावारी बापेरे या ग्रामपंचायतींची मुदत ९ फेब्रुवारी रोजी संपली आहे. तर मठ, भडे, कुरंग आणि शिपोशी या ग्रामपंचायतींवरही यापूर्वीच प्रशासक नेमण्यात आले होते.
दरम्यान, एका विस्तार अधिकाऱ्याकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे कठीण होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तर तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसमोर ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे चालवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY