लांजा : तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून याप्रकरणी तीन जणांविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश राजाराम कांबळे (वय ४४, रा.कोचरी, बौध्दवाडी, ता.लांजा) आणि संशयित कुंदन अनंत कांबळे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. दि .१४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दिनेश कांबळे हे घराशेजारील बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित कुंदन कांबळे याने त्यांना तू कशाला अगरबत्ती लावतोस, इथून निघून जा असे म्हणून हटकले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
यावेळी राग अनावर झाल्याने कुंदन कांबळे याने फिर्यादींना थापाड्यांनी मारहाण करत ढकलाढकल केली. याच दरम्यान कुंदनचे भाचे निलेश अनिल जाधव (वय २३) आणि अजय अनिल जाधव (वय २८) दोन्ही राहणार कोचरी बौद्धवाडी, हे देखील तिथे पोहोचले. त्यांनी दिनेश यांना खाली पाडून बेदम मारहाण केली.असे फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी संशयित निलेश जाधव याने आपल्या हातातील कडा काढून दिनेश यांच्या डोळ्याखाली मारला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, पतीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या दिनेश यांच्या पत्नीलाही संशयितानी धक्काबुक्की केली. या संपूर्ण घटनेत दिनेश कांबळे हे जखमी झाले आहेत. असे पोलीस ठाण्यात दाखल केलेले तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर दिनेश राजाराम कांबळे यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार लांजा पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोजी कुंदन कांबळे, निलेश जाधव आणि अजय जाधव यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१ (२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला.याबाबत अधिक तपास लांजा सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करत आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY