लांजा: तालुक्यात चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणात एकूण ३५ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. त्यासाठी १५६ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून 105 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून 73891 मतदार मतदान करतील अशी अपेक्षा आहे. तर मतदान पेट्या नेण्यासाठी १४ एसटी बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद आसगे गटात शिवसेना शिंदे विरूद्ध ठाटरे गट, भांबेड जिल्हा परिषद गटात शिंदे विरूद्ध ठाकरे गट, साटवली जिल्हा परिषद गटात शिंदे विरूद्ध काँग्रेस गट, जिल्हा परिषद गवाणे गटात शिवसेना शिंदे विरूद्ध ठाकरे गट व अपक्ष असे तिन उमेदवार एकूण ४ जागेसाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.
पंचायत समिती गणात आठ जागांसाठी एकूण २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आसगे गणात शिंदे, ठाकरे,व अपक्ष तर वेरवली गणात शिंदे,ठाकरे,अपक्ष , असे ३ उमेदवार,प्रभानवल्ली गणात शिंदे,ठाकरे, व अपक्ष २, एकूण ४उमेदवार,भांबेड गणात भाजप, ठाकरे,व अपक्ष २ असे ४ उमेदवार, वाकेड गणात शिंदे, विरूद्ध ठाकरे, साटवली गणात शिंदे,ठाकरे,अपक्ष असे ३उमेदवार, गवाणे गणात शिंदे विरूद्ध ठाकरे, खानवली गणात शिंदे,ठाकरे, काँग्रेस व अपक्ष २ असे एकूण ५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.लांजा तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ६ पोलीस अधिकारी,६२ पोलीस कर्मचारी ८८ होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
