लोटे (ज्ञानेश्वर रोकडे ): लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये बेसुमार माती उत्खनन सुरू असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत संबंधित यंत्रणांना विचारले असता त्यांच्याकडून माहिती देण्याचे टाळले जाते किंवा चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जाते,असा आरोप येथील नागरिक करत आहेत.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये तलारी फाटा ते वसाहतीमधील कारखाने असे अंतर्गत रस्त्यांचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने चालू आहे. या कामासाठी लागणारी माती ही नजीकच्या एका टेकडीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून मिळविण्यात येत आहे. यासंदर्भात एमआयडीसीकडे चौकशी केली असता, ‘हे काम एका कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले गेले असून ज्या जागेत माती उत्खनन केली जात आहे ती जागा एमआयडीसीच्या मालकीची नाही. परिणामी त्याची रॉयल्टी त्यांनी भरली आहे की नाही हे पाहणे महसूल खात्याचे काम आहे,असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर यासंदर्भात महिला तलाठ्यांना विचारले असता त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधा असे सांगितले. मात्र मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याबाबत काही ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, ती जागा खाजगी मालकीची नसून एमआयडीसीच्याच मालकीची आहे, असे सांगण्यात आले. एकीकडे राज्य सरकारकडे लोकाभिमुख योजना राबवण्यासाठी निधी कमी पडत असताना शासनाचा लाखो रुपयांचा महसूल अशा वेळी बुडत असताना दिसतो. याबाबत जागरूक नागरिकांनी चौकशी केली असता संबंधित यंत्रणांकडून त्यांची दिशाभूल केली जाते किंवा माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे नागरिकांमध्ये या यंत्रणाबाबत व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
