लोटे : लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कोकण गौरव पुरस्कार दिले जातात.यावर्षी संस्था विभागात चिपळूणच्या “कोकण वुमेन,युथ अँड स्टुडंट्स डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी’ ची जिद्द’ मदिमंदमुलांची शाळा” या संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आला.तसेच व्यक्तीगत विभागात संगमेश्वरच्या मा. श्री. उदय श्रीधर लोध यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला.
लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्यावतीने कोकणात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती आणि संस्थेला कोकणगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार चिपळूणच्या “कोकणवुमेनयुथ अँड स्टुडंट्स डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटीच्या’ जिद्द’ मदिमंद मुलांची शाळा” या संस्थेला व व्यक्तीगत पुरस्कार संगमेश्वरचे उद्योजक व सामाजिक कार्य करणा-या मा. श्री. उदय श्रीधर लोध यांना देण्यात येणार आहे. असे लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे व जनरल सेक्रेटरी श्री. राजकुमार जैन यांनी जाहिर केले.
यावर्षी’ कोकण गौरव’ या पुरस्कारासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेञात काम करणा-या कोकणवुमेनयुथ ॲड स्टुडंट्स डेव्हलपमेंट सेंट्रलसोसायटीच्या जिद्द’ मदिमंदमुलांची शाळा’ या संस्थेची निवडकरण्यात आली आहे. ही संस्था ‘जिद्द मतिमंद मुलांची शाळा’ ही चिपळूणमधील एक संस्था आहे जी दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी काम करते, जिथे त्यांना प्रेमळ आणि विशेष वातावरणात वाढवले जाते. ही एक विशेष शाळा आहे, जी मतिमंद बौद्धिक अक्षम असलेल्या मुलांसाठी तसेच दिव्यांग मुलांच्या सर्वागिन, शिक्षण आणि कौशल्य विकासाचे कार्य करत आहे. ही शाळा त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, त्यांचे जीवन अधिक सुकर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण देते. मतिमंद मुलांना शिक्षण देणे, त्यांची कौशल्ये विकसित करणे आणि त्यांना समाजात एकटे न राहता स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश या शाळेचा आहे.
तसेच व्यक्तीगत पुरस्कारासाठी सामजिक व उद्योग क्षेञात काम करणा-या मा. श्री. उदय श्रीधर लोध यांची कोकण गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलडीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री. उदय लोध हे उद्योजक, स्वयंरोजगार आणि वाहतूक क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात, विशेषतः महाराष्ट्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, उद्योजकांशी संवाद साधणे आणि करांच्या मुद्द्यांवर मत मांडणे यांसारख्या कामांसाठी ते चर्चेत असतात, विविध स्वयंरोजगार शिबिरात मार्गदर्शन आणि पेट्रोल डिझेल वरील करांच्या सदर्भात त्यांची भुमिका महत्वाची असते. त्यांनी पर्यटन व आदरातिथ्य आणि पेट्रॉल व डिझेल सेवा तळागाळापर्यत पोहचवली आहे. लायन्स इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या संघटनेचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर पद त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले आहे. भारतीय पेट्रोलियम डीलर्स संघाचे ते संस्थापक सदस्य असुन सध्या ते भारतीयपेट्रोलियम डीलर्स संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन कामकरत आहेत.
उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड .राज आंब्रे, उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी, सेक्रेटरी श्री. राजकुमार जैन, सहसेक्रेटरी श्री. सुर्यकांत वडके, खजिनदार मिलिंद बारटक्के, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटर्वधन, संचालक श्री. शिरीष चौधरी, श्री.विश्वास जोशी, श्री. रविंद्र कदम, श्री. संकेत मेहता, श्री. किसन चव्हाण, श्री. मंदार अडिवरेकर, श्री. राजेश तिवारी, श्री. श्रीपाद देशपांडे यांनी अभिनंदन केले. कोकणगौरव पुरस्कार वितरण सोहळा लोटे परशुरामइंडस्ट्रीज असोसिएशनच्या वर्धापनदिनी दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी मा. श्री. रविंद्र माणगावे, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व मा. सौ. नीता केळकर, स्वतंञ संचालिका, म.रा.वि.मं. सूञधारी कंपनी मर्या. यांच्या हस्ते उद्योग भवन लोटे येथे संपन्न होणार आहे
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY