चिपळूण : महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचे अधिवेशन 23 फेब्रुवारी रोजी सुरू होत असून या अधिवेशनात महाराष्ट्रात
‘लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतर विरोधी विरोधात कायदा’ संमत करण्यात यावा, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील देवस्थानांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यातून कोणताही प्रकारच्या नोटीस न देता जिल्हाधिकारी यांच्या बेकायदेशीर पत्रावरून संबंधित तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या देवस्थानांची नावे उताऱ्यावरून कमी केल्यामुळे या प्रशासनाच्या निर्णय बद्दल जिल्ह्यातील गावागावातील हिंदूंमध्ये असंतोष वाढत आहे. देवस्थानांच्या जमिनी पूर्ववत त्यांच्या नावावर कराव्यात, यासाठी या अधिवेशनात ठोस निर्णय घेतला जावा. तसेच देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी अवैध हलाल प्रमाणपत्र प्रणालीवर देशव्यापी बंदी घालण्यात यावी, तिन्ही मागण्यांची निवेदन पत्रे आज चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आले. तसेच लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा संमत व्हावा हे निवेदने उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण यांच्याकडेही देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे युवा उपतालुकाप्रमुख आदित्य जोशी, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे अमित जोशी आणि प्रशांत उतेकर, सकल हिंदू समाज संघटनेचे राजेश ओतारी आणि हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके हे उपस्थित होते.
महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा संमत झाला पाहिजे🔸हिंदू जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन
