मंडणगड (प्रतिनिधी) – विधानसभेत महायुतीच्या निर्णायक विजयास कारणीभूत ठरलेली लाडकी बहीण योजना स्थानीक स्वराज्य सस्थांचे यंदाचे निवडणुकांवरही मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात पुरुषापेक्षा महिला मतदारांची संख्या 2 हजाराहुन अधिक असुन 28700 महिला मतदार मतदान करणार आहेत यातील सुमारे 15 हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण या योजनेचे गतवर्षी लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. यातील निकषांचे शोध मोहीमेत 1 हजाराहून अधिक महिला गेल्या चार महिन्यांपासून योजनेच्या लाभापासून वंचीत राहीलेल्या आहेत. त्यामुळे निर्णायक भूमीकेत असलेल्या लाडक्या बहीणी यंदाचे निवडणुकीत सहा शुन्य विजयाचा दावा करणाऱ्या शिंदे शिवसेनेस तारणार की बुडविणार या विषयी कमालीची उत्सुकता आहे. लाभ मिळून चार महिने खात्यात पैसे न आलेल्या लाडक्या बहीणींची नाराजी कांटे टक्कर असलेल्या निवडणुकीत निर्णायक ठरणारी आहे. शिवेसनेने तालुक्यात शेकडो कोटींच्या पायाभुत सुविधांची विकासकामे केली आहेत गेल्या एक वर्षापासून तालुक्यातील गावेच्या गावे या पक्षात प्रवेश करीत आहेत, अनेक पक्षांचे महत्वाचे पदाधिकारी नेते सेनेत गेले आहेत या सर्व वातावरण निर्मीतीचे परिस्थितीत प्रवेश करणाऱ्यांची किती मते सेनेकडे ट्रान्सफर झाली आहेत अथवा नाहीत याबद्दल कोणीही खात्रीने सांगु शकत नाही. कारण तालुक्यातील सर्वच पक्ष व राजकीय कार्यकर्ते व मतदानावर प्रभाव टाकणारे घटक आपले कोअर मतदान आपल्यामागे ठाम उभे असल्याचे दावे करीत आहेत त्यातही निवडणुक प्रचाराचे शेवटच्या टप्यात प्रचारांचा फोकस गावकी, भावकी, जातींचे मुद्यांवर केंद्रीत झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सुरविताला निरस वाटणारी निवडणुक आता आव्हानात्मकच्या पातळीवर पोहचली आहे. खासदार सुनील तटकरे व आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांमध्ये स्थानीक पातळीवर गेल्या पाच वर्षापासून कधी समोरासमोर तर कधी पडद्याचे मागे सुरु असलेल्या राजकीय संर्घषात तालुक्यात कोण श्रेष्ठ आहे याचे उत्तर या निवडणुकीत निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील लढतींचे चित्र – जिल्हा परिषद गट बाणकोट मधून शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांच्या विरोधात दोन वेळा जिल्हा परिषद राहीलेले प्रकाश शिगवण यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. खुल्या प्रभागासाठी आऱक्षित असलेल्या जिल्हा परिषद गट भिंगळोली माजी उपाध्यक्ष संतोष गोवळे, व माजी जि.प.सदस्या अस्मिता केंद्रे हे दोन कुणबी उमेदवार परस्परांचे विरोधात उभे राहीले आहे. या दोघांचीही प्रतिष्ठा निवडणुकीत पणास लागलेली आहे. इस्लामपुर पंचायत समिती गण 1 मधून माजी सभापती प्रणाली चिले यांची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे त्यांना उबाठा शिवसेना व भाजपाचे उमेदवारांने आव्हान दिले आहे. भिंगळोली पंचायत समिती गण क्रमांक 2 मधून मागील निवडणुकीत थोडक्या मतांना पराभूत झालेले शिवसेनेचे दिपक मालुसरे यांच्यासमोर लढण्यासाठी महाआघाडीतील महाआघाडीतील राष्ट्रवादी व उबाठा यांना आपले वेगवेगळे उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविलेल्याने विरोधकांची ताकद पुर्णपणे विभागली गेल्याने मालुसरेची वाट सोपी झाल्याचे वरकरणी दिसत आहेत. बाणकोट पंचायत समिती गण क्रमांक 3 मधून मिरकर विरुध्द रटाटे ही लढत दुरंगी लढतीत पुर्वी पंचायत समिती सदस्य राहीलेल्या मिरकर यांची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे. तुळशी पंचायत समिती गण क्रमांक 4 मधील महिलांची चौरगी लढत भाजपच्या आयत्यावेळीचे प्रवेशाने लक्षवेधी ठरली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
