चिपळूण- कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आज गुरुवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संयोजन समितीचे अध्यक्ष साहित्यिक श्री प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे,प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, स्मरणिका छपाई समिती अध्यक्षा सौ. अंजली चोरगे,कोषाध्यक्ष श्री अजय चव्हाण, साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार समिती प्रमुख डॉ. शमिका चोरगे, संस्थेचे सचिव श्री मिलिंद सुर्वे, प्राचार्य डॉ.संकेत कदम,प्राचार्य सचिन तांबेकर व रावसाहेब सुर्वे उपस्थित होते.
१३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस मांडकी पालवण येथे ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन होत आहे. सध्या या संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली असून हे संमेलन आगळ वेगळे आणि भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
