माणगाव – (परेश शिंदे) :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे संपूर्ण राज्यात जोरदार वाहत आहेत. सर्व पक्षीय उमेदवार यांनी प्रचारात वेग धरला आहे. गाव बैठका, सभा, आरोप, प्रत्यारोप फेरा जोरात सुरू आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मोर्बा जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्ष ताकदीने निवडणूक लढवित आहे. या गटात झालेल्या विकासकामांच्या जोरावर शिवसेना पक्षाचा झेंडा निश्चित फडकेल, असा विजयाचा ठाम विश्वास मोर्बा जिल्हा परिषद गट उमेदवार रमेश मोरे यांनी व्यक्त केला आहे.
मागील सात वर्षांपूर्वी या जिल्हा परिषद गटातून आरती रमेश मोरे या ५४०० अशा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गाव व वाडीवर रमेश मोरे यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहे. रस्ते, वीज , शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, गेटारे, स्मशानभूमी, पाणी योजना यांसारखे अनेक विकासाची कामे आरती मोरे यांच्या रूपाने रमेश मोरे यांनी प्रत्येक गाव वाडीवर केली आहेत. तेथील जनतेशी आमचा चांगला जनसंपर्क आहे. तसेच मंत्री भरत गोगावले यांनी या गटात विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळे होणारी निवडणूक ही एकतर्फी होऊन त्यात कोणत्याही प्रकारची चुरस नसल्याचे उमेदवार रमेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
कामाचा अनुभव सात वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी (आरती मोरे) या गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून रस्ते, पाणी, गटारे, स्मशानभूमी आणि संरक्षण भिंती यांसारखी अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.समाजसेवा राजकारणापलीकडे जाऊन तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन किंवा सरकारी रुग्णालयातील कामांसाठी ते नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जातात. बेरोजगारीचा प्रश्न या भागात रोजगाराची साधने कमी असल्याने अनेक लोक मुंबई, पुणे किंवा सुरत सारख्या शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. तरुणांच्या या बेरोजगारीच्या प्रश्नावर त्यांनी विशेष भर दिला आहे. व भविष्यात रोजगारासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
एमआयडीसीचा (MIDC) प्रस्ताव
मंत्री भरत गोगावले आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून या भागात एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्थानिक लोकांना या ठिकाणी येथेच रोजगार मिळून, येथेच कसं त्यांना रोजगार निर्मिती करून राहता येईल याकडे प्राधान्य देण्याचा म मानस आहे. निवडणुकीनंतर तात्काळ त्या ठिकाणी कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. सात वर्षं येथे असणाऱ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच ते अग्रस्थानी राहिलेले आहेत. केलेली विकासाची कामं आणि पुढे करणार हा लोकांचा ठामपणे विश्वास आहे. जेव्हा जेव्हा लोकांना मत रूपी आशीर्वाद मागण्यासाठी गाव भेटीला जातोय किंवा वैयक्तिक भेटीला जातोय, त्यावेळी लोकं त्या ठिकाणी ठामपणे सांगतात ‘तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत राहा कारण तुम्ही केलेली कामं किंवा तुम्ही केलेला विकास हा आम्ही कदापि विसरणार नाही’. त्यामुळे जिल्हा परिषदेवरती मोर्बा गटातून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
शिवसेना पक्ष तर्फे मोर्बा जिल्हा परिषद गटातून रमेश मोरे, वडवली पंचायत समिती गणातून ज्ञानदेव पदरत, मोर्बा पंचायत समिती गणातून पल्लवी मोरे या निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेना पक्षाने या विभागता जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून गाव बैठका व गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. मोर्बा मतदार संघातील मुस्लिम, कुणबी, मराठा, बौद्ध, आदिवासी प्रत्येक समाजातील लोकांना भेटताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान जाणवत. त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या भागातील जनता सुज्ञ असून विकास करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जो जनतेच्या सुखदुःखात रात्री अपरात्री धावतो त्यालाच येथील जनता येथे ७ तारखेला मतदान करेल. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची नसून मी प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास यावेळी शिवसेना पक्ष उमेदवार रमेश मोरे यांनी व्यक्त केला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
