चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या मार्च २०२६-२७ अर्थसंकल्पात चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील रु. २५ कोटी रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे. मतदार संघातील रस्ते वाहतुकीसाठी सुव्यवस्थितीत असण्यासाठी आमदार शेखर निकम हे कायम प्रयत्नशील असतात व त्यांचा त्यादृष्टीने कायम शासन दरबारी त्यांचा पाठपुरावा चालू असतो. राज्याच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पात पुढील कामांना मंजुरी मिळाली आहे.
१) रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील चिपळूण गुहागर बायपास रस्ता रामा 136अ कि.मी. 0/00 ते 3/500 मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 250.00 लक्ष
२) रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील खेर्डी टेरव कामथे रस्ता प्रजिमा 109 कि.मी.0/00 ते 8/500 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे ता.चिपळूण – 590.00 लक्ष
३) रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गणेशखिंड सावर्डा दुर्गवाडी तळवडे रस्ता प्रजिमा 33 कि.मी.1/200 ते 2/700,3/100 ते 4/400,4/900 ते 5/800, 6/00 ते 7/400, 7/600 ते 8/800, 9/100 ते 10/500 व 11/400 ते 13/200 मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.चिपळूण – 480.00 लक्ष (सावर्डे दहिवली फाटा ते खरवते – साधारण ९ किमी अंतर)
४) रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यतील पिंपळी नांदिवसे रस्ता प्रजिमा 23 कि.मी.0/00 ते 3/00 मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.चिपळूण – 120.00 लक्ष
५) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा देवरुख संगमेश्वर रस्ता रा.मा 166 कि.मी 16/00 ते 18/500, 19/800 ते 20/500, 22/500 ते 32/00 मध्ये डांबरीकरण करणे. – 650 लक्ष ( गाव – देवरुख मुरदापुर तिठा ते संगमेश्वर – लांबी किमी 11.500 )
६) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबे रातांबी राजीवली रस्ता प्रजिमा-44 कि.मी 16/00 ते 23/00 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे व कि.मी 17/00 मधील पुलाची दुरुस्ती करणे (लांबी – 3 किमी) – 210 लक्ष (गाव – कुचांबे ते रातांबी – लांबी 5 किमी)
७) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ओझरे काटवली विघ्रवली सोनवडे मुचरी कळंबस्ते रस्ता प्रजिमा-49 किमी 20/00 ते 25/00 मध्ये रस्त्याचे मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करणे – 200 लक्ष ( गाव – मुचरी ते कळंबस्ते – लांबी 5 किमी)
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
