चिपळूण:_ भात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे शासनाकडून पंचनामे केले गेले, परंतु अद्याप शेतकऱ्यांना एकही रुपया नुकसान भरपाई मिळालेली नाही. हा कोकणातल्या शेतकऱ्यांवर शासनाने केलेला अन्याय आहे. आता बागायतदारांचा हापूस व काजू तसेच परस बागांमध्ये असणारे हापूस आंबे या सर्व फळांच्या झाडांचा मोहर दूषित हवामानामुळे करपून गेला आहे.

आता कोकणातल्या शेतकऱ्यांवर आलेले हे दुसरे संकट आहे त्यामुळे शासनाने कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, कोकणामध्ये भातशेती व हापूस आंबा हे महत्वाची पिके आहेत. सर्व सामान्य शेतकरी व बागायतदार यांचा वर्षकाठीचा उदरनिर्वाह वरील दोन पिकांवर अवलंबून आहे. हापूस, काजू यांना आलेल्या मोहरावर करपा पडल्यामुळे उत्पन्नाचे साधन बुडाले आहे. खत व फवारणीचा खर्च वाया गेला आहे. हापूस व काजू वरील करपा पडल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट आले आहे.तरी कृषी विभामार्फत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुकादम यांनी शासनाकडे केली आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY