शिरगाव ( निसार शेख ) : तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे यांचा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांच्या निवासस्थानी सत्कार कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला .यावेळी गावच्या सर्वांगीण विकासाठी नेहमी कटिबद्ध राहण्याचे अभिवाचन प्रभाकरराव शिंदे यांनी दिले.यावेळी त्यांनी भरत लब्धे यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध कसे आहेत याचा दाखला दिला तर राजकारण विरहित काम केल्यास आपल्या गावचा सर्वांगी विकास होऊ शकतो असे भाष्य केले यावेळी आई महाकाली देवीची यात्रा, जन्मदिवस आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पद आपल्याला त्यादिवशी मिळाले यातच स्वतःला भाग्यवान समजतो असे मत व्यक्त करीत भरत लब्धे यांचे कौतुक केले.

शिरगाव गावचे सुपुत्र प्रभाकरराव शिंदे हे मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष झाल्यावर शिमगा सणासाठी गावी आले होते यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ पार पडला यावेळी व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रकाश लब्धे,शिरगाव सोसायटी चेअरमन जयंतराव शिंदे,चिपळूण माजी नगरसेवक राजू देवळेकर,शिरगाव शिक्षक प्रसारक संस्था प्रभारी अध्यक्ष नितीन शिंदे,महेंद्रराव शिंदे,प्रदीप शिंदे, निलेश नारकर, केशव लांबे, ह भ प लक्ष्मण जाधव आदीसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नगरसेवक राजू देवळेकर,शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे,शिरगाव प्रसारक संस्था प्रभारी अध्यक्ष नितीन शिंदे,पोलिस महेंद्र शिंदे,व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रकाश लब्धे यांनी मनोगत मधून प्रभाकरराव शिंदे यांच्या कामाचे कौतुक भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
तर काँगेस जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमवरील भारत पाकिस्तान मंच होऊ नये याची जबाबदारी प्रभाकरराव शिंदे यांच्यावर दिली होती आणि त्याने कशाप्रकारे पार पडली होती याची माहिती सादर करीत ,कोयना प्रकल्पात येथील ठेकेदार कशा प्रकारे कामगाराची पिळवणूक करीत आहेत त्याकडे त्यांचे लक्ष केंद्रित केले तर शिरगाव शिक्षणं प्रसारक संस्था यांच्या माध्यमातून गावातील शाळा पुनर्जीवित करण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत लवकरच ठाणे नगरसेवक मनोज शिंदे आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे यांचा मोठा सत्कार सोहळा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले
तर मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे यांनी 2004 साळी चिपळूण आमदारकीची निवडणूक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेमुळे लढलो त्यामध्ये पराभव झाला त्याबाबत अनेकवेळा बोलले जाते पण मी निवडणुकीला उभा राहिलो आणि सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधान झाले यातच मी भाग्यवान समजतो यावेळी त्यांनी भरत लब्धे यांच्या कामाचे कौतुक केले जरी ते दुसऱ्या पक्षाचे असले तरी आमच्यात एक कौटुंबिक नाते आहे आणि महिन्यातून अनेक वेळा विविध विषयावर आमची चर्चा होते तर गावातील विकास कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली काल केलेली पाखाडी रस्ते दुसऱ्या दिवशी नादुरस्त होत असतील तर असली कसली विकास कामे असा सवाल उपस्थित करीत 48000 कोटीत मला मुंबईचे अनेक विकास कामे करायची आहेत आणि ती जर उत्तम रित्या केली तर मुंबईकर आम्हला डोक्यावर घेतील पण आज सांगतो आता भाजपाचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत त्याही पेक्षा जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत आपल्या गावासाठी खूप काही करता त्यासाठी समिती गठीत करा आणि एक वज्रमुठ करा राजकारण विरहित काम करा गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपल्या पाठीशी नेहमी उभा राहील अशा आश्वासन मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले यावेळी आभार प्रदर्शन ह भ प लक्ष्मण जाधव यांनी केले.