बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हजारो चाहत्यांनी “अजित दादा परत या…”, “अजित दादा अमर रहे…” अशा गगनभेदी घोषणा देत एकच हंबरडा फोडला.

अवघा महाराष्ट्र आज सुन्न असून निःशब्द आहे. आज आपल्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे डबडबले होते.

अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांचे दूरध्वनीवरून सद्भावना व्यक्त करून सांत्वन केले.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, निलम गोऱ्हे, आदिती तटकरे यांनीही आपल्या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला. अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून आज अंत्यसंस्काराला लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. अजितदादा यांचे बारामती येथे बुधवारी सकाळी ८:५० वाजता विमान अपघातात निधन झाले त्यांच्यासह अन्य पाचजणांचा ही मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने निःशब्द झाला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY