मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असतानाच ही घटना घडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने खालील मोठे निर्णय घेतले आहेत.

प्रचार सभा रद्द: निवडणुकीसाठी आता कोणतीही जाहीर सभा किंवा ‘रोड शो’ आयोजित केला जाणार नाही. साधेपणाने प्रचार: उमेदवारांनी केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटून मतदारांशी संवाद साधावा, असे आदेश देण्यात आले आहेत. मिरवणुकीवर बंदी: निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची विजयी मिरवणूक काढली जाणार नाही. अजित दादांच्या जाण्याने पक्षाचे आणि राज्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि आदर राखण्यासाठी आम्ही प्रचाराचा झगमगाट पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी पक्षाची भुमिका आहे. बारामतीत त्यांच्या चार नियोजित सभा होत्या, मात्र त्यापूर्वीच नियतीने घाला घातला. आता केवळ पत्रकबाजीच्या माध्यमातून निवडणूक लढवून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY