चिपळूण : शिमगा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पेठमाप येथील शेरणे काढण्याच्या मैदानाची पाहणी केली. या विस्तीर्ण मैदानावर आदिशक्ती श्री करंजेश्वरी देवीच्या शिमगा महोत्सवानिमित्त शेरणे काढण्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी या मैदानाला भेट देऊन पाहणी केली आणि उत्सव सुरळीत पार पडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

श्रीदेवी करंजेश्वरी देवीचा शेरणी काढण्याचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात. भाटण परिसरात भरतीचे व साचलेल्या पाण्यामुळे शेरणी काढण्याच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण होत असल्याने या ठिकाणी जलसंपदा विभाग व चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी नगराध्यक्षांनी केली.

यावेळी उपनगराध्यक्षा सौ.रूपाली दांडेकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उदय जुवळे, नगरसेवक प्रमोद बुरटे, विकी लवेकर, श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कपडेकर, कट्ट्या देवळेकर, यतीन दांडेकर तसेच नगर परिषदेचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी श्रीदेवी करंजेश्वरीचा शेरणी काढण्याचा कार्यक्रम विना विघ्न व सुरक्षितपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY