पनवेल : प्रशासकीय गतिमानता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर आता सर्वत्र अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत असून त्याचे दृष्य परिणाम देखील प्राप्त झाले आहेत. याच विचारातून पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सर्व म्हणजे ७८ नगरसेवकांना प्रथमच आधुनिक टॅबलेट (संगणक) तसेच महापालिका अधिनियमांचे मार्गदर्शक पुस्तक देण्याचे नियोजन पनवेल महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.या अत्याधुनिक टॅबलेटच्या माध्यमातून नगरसेवकांनी महापालिकेचा दैनंदिन कारभार हाताळावा, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
नुकत्याच ई-गव्हर्नन्समध्ये राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पनवेल महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावत आपली डिजिटल क्षमता अधोरेखित केली आहे. सध्या महापालिकेत ई-ऑफीस प्रणालीद्वारे कामकाज सुरू असून पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम महापालिकेचा सर्व कारभार पेपरलेस करण्यावर भर दिला. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी ई-ऑफीसवर काम करत आहेत. याच धर्तीवर लोकप्रतिनिधी असलेल्या नुतन नगरसेवकांनीही त्यांच्या तक्रारी, सूचना व पत्रव्यवहार टॅबवरून ई-मेलद्वारे केल्यास प्रशासनाकडून तातडीने त्यास प्रतिसाद देता येईल, असा महापालिका प्रशासनाचा विश्वास आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY