चिपळूण  : येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची पदोन्नतीने सातारा जिल्हयातील रहिमतपूर येथे बदली झाल्याने काल गुरुवारी त्यांनी नगरपालिकेतील आपल्या सहकाऱ्यांचा भावनिक निरोप घेतला. चिपळूणने मला खूप प्रेम दिले. सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी चांगले काम करू शकलो, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. नगर पालिकेतून बाहेर पडताना 1877 साली स्थापन झालेल्या चिपळूण नगर परिषदेच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायऱ्यांवर ते नतमस्तक झाले. नगर परिषद इमारतीला त्यांनी नमस्कार केला त्याक्षणी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आपल्या सेवाकाळातील आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला.

प्रशासक म्हणून कार्यरत असताना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले. प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष मोहीम, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वाचू आनंदाने उपक्रम, प्रदूषणमुक्ती व इंधन बचतीसाठी सायकल डे यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांच्या कार्यकाळाची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. आपल्या कामाची ठसा उमटवून गुरुवारी ते रहिमतपूर येथे मुख्याधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी रवाना झाले. यानिरोपप्रसंगी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, सुजित जाधव, बापू साडविलकर, संतोष शिंदे यांच्यासह नगर परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याधिकाऱ्यांनीही सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचा निरोप घेतला. जड पावलांनी आणि भावनिक मनाने विशाल भोसले चिपळूणहून रहिमतपूरच्या दिशेने रवाना झाले.

सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY