रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिलेला रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली युतीने घवघवीत यश संपादन केले असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ४० जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असल्याचे वृत्त आहे तर चार जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एकही जागा मिळाली नसून या पक्षाचे पानिपत झाले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच जागांवर उमेदवार निवडून आणले आहेत तर ठाकरे सेनेचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेनेही आपले खाते उघडले असून मनसेचा एक उमेदवार निवडून आला आहे.
या निवडणुकीमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेवर युतीचे वर्चस्व प्रस्थापित करून पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाचे भेट दिली असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
