पेण :

बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. “कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. प्रांत कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत बेमुदत उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले आहे . प्रशासनाला यापूर्वी सुद्धा निवेदन देण्यात आले होते. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.या उपोषणाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकळं, महासचिव संघटक काँग्रेस नंदा म्हात्रे, श्रुती म्हात्रे, महिला जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस राणी अग्रवाल, यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिबा दर्शवला.