नवी दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक्स पोस्ट करून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे.
“महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो अशी प्रार्थना करतो”, असं म्हणत इतर मृतांच्या नातेवाईकांसाठीही नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
