पोलादपूर (शैलेश पालकर)- छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्यासोबत केल्याप्रकरणी राज्यात सर्वत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला जात असताना पोलादपूर भाजपाचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे यांच्या नेतृत्वाखाली सपकाळ यांची चित्रं जाळून छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोरे निषेध करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष तनुजा भागवत यादेखील निषेधकर्त्यांत सामील होत्या.
पोलादपूर तालुका भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोर तालुकाअध्यक्ष वैभव चांदे, राजेश सकपाळ, महेश निकम, प्रमोद चव्हाण, आशुतोष दरेकर, सपना बुटाला, गणेश शेठ, मनोज पवार आणि संचिता चांदे यांनी भाजपा महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष तनुजा भागवत यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देऊन त्यांची छायाचित्रे जाळली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY