पोलादपूर : पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बुधवारी जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहानंतर तपास यंत्रणेची चक्रे वेगाने फिरवली जात असून गुन्हे अन्वेषण विभागाकडून मृतदेहाच्या शारिरीक ठेवणीवरुन महिलेचे रेखाचित्र तयार करून प्रसारित करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी आंबेनळी घाटाच्या रुंदीकरणाच्या कामातील एका सिमेंट काँक्रीटच्या भिंतीतील मोरीच्या पाईपामध्ये एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी प्रयत्नांची शर्थ चालवली असून गुन्हे अन्वेषण विभागाचे सहकार्य याकामी घेतले आहे.
महिलेच्या डाव्या हाताच्या करंगळी लगतच्या बोटात लाल रंगाच्या खड्याला कोंदण असलेली अंगठी आहे तर दोन्ही पायांच्या अंगठ्याजवळील बोटात जोडव्या आहेत. मृत महिलेच्या रेखाचित्रावरुन वर्णनाप्रमाणे वय, पत्ता व अन्य सविस्तर माहिती असल्यास कळविसाठी सपोनि आनंद रावडे (9011761573), उपनिरीक्षक मंगेश मुंडे (7767089408) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH
