रत्नागिरी(राजेंद्र चव्हाण) : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीसाठी , दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, रविवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
यावेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 151 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 321 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील 11 लाख 73 हजार 899 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यांच्यासाठी जिल्हाभरात 1,693 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून 4,266 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. यासाठी 5,455 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 76 पोलीस अधिकारी, 1,524 पोलीस अंमलदार आणि 1,900 होमगार्ड सहभागी असणार आहेत. तसेच अतिसंवेदनशील भागांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांची तैनाती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, गस्त व नाकाबंदी वाढवण्यात आली आहे.
निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मशिन्स कडेकोट सुरक्षा असलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार असून, दि. 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदारांना निर्भयपणे बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
