देवरुख:संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटात महायुतीमध्येच हाय-व्होल्टेज लढत होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. येथे भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना अशी मैत्रीपूर्ण पण चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

कोसुंब गटात महायुती आमनेसामने उभी ठाकली आहे. माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने हे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून, तर भाजपकडून प्रमोद अधटराव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

संपूर्ण भाजप आपल्या सोबत असल्याचा दावा माजी आमदार सुभाष बने यांनी केला होता. मात्र हा दावा भाजपचे उमेदवार प्रमोद अधटराव यांनी फेटाळून लावला आहे.
“भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाही. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यांच्या गटातील किती कार्यकर्ते आणि नेते माझ्यासोबत आहेत, हे येत्या नऊ तारखेला स्पष्ट होईल,” असा विश्वास अधटराव यांनी व्यक्त केला आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY