चिपळूण – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत आज मांडकी पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार प्रमोद खेडेकर यांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.श्री.चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.उद्या मंगळवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन सावर्डे गटातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होऊ असे खेडेकर यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी वेहेळे पंचायत गणाप्रमाने मांडकी गणातही आपल्या कुशल नेतृत्वाची जादू करून शिवसेनेचे पारडे मजबूत केले आहे.
सावर्डे जिल्हा परिषद गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.या गटात शिवसेकडून माजी सभापती धनश्री शिंदे तर राष्ट्रवादी कडून आमदार शेखर निकम यांच्या पत्नी माजी सभापती पूजा निकम आमने सामने आहेत.दोन माजी सभापतींमधील ही लढत चांगलीच लक्षवेधी ठरते आहे. यावेळी सावर्डे पंचायत समिती गणातून माजी उपसभापती युवराज राजेशिर्के तर मांडकी गणातून विद्यमान सरपंच अनंत खांबे लढत आहेत.शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा धडाका लावला. अनेक ठिकाणी त्यांची मध्यस्थी यशस्वी झाली.अनंत खांबे यांच्या सारख्या एका होतकरू कार्यकर्त्यांच्या विजयाचे शिल्पकार होण्याची सदानंद चव्हाण यांनी केलेली विनंती मान्य करून प्रमोद खेडेकर यांनी सदानंद यांच्या नेतृत्वाखाली थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.उद्या मंगळवारी आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सावर्डे गटातील शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेऊ आणि त्यांच्या विजयासाठी मेहनत करू असा शब्द त्यांनी सदानंद चव्हाण यांना दिला. आता मांडकी गणासह संपूर्ण सावर्डे जिल्हा परिषद गटात महायुतीची बाजू बळकट झाली आहे.सर्व शिवसैनिकांनी खेडेकर यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY