चिपळूण :- आम्ही मक्तेदारी जपत नसून ‘जनसेवा हाच आमचा ध्यास’ या उक्तीमुळे आम्हाला जनतेचे प्रेम मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी संधी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत, त्यामुळे साळवी कुटुंबावर करण्यात आलेला मक्तेदारीचा आरोप हास्यास्पद आणि मूर्खपणाचा आहे असा जोरदार शाब्दिक पलटवार चिपळूण तालुक्यातील शिरगाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. स्नेहा साळवी यांनी केला.
शिरगाव गणातून निवडणूक लढविणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराने प्रचारादरम्यान मक्तेदारीचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना स्नेहा साळवी यांनी म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते दादा साळवी यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली नाही. तर पोफळी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दिलीच शिवाय त्या उमेदवारांना निवडूनही आणले. यापूर्वी पोफळी जिल्हा परिषद गटातून दीपक घाग , गणेश कोलगे, मनोहर मोहिते, सौ. जागृती शिंदे, सौ. प्रभावती डांगरे यांना संधी देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पाच वर्षांपूर्वी झालेल्या पोफळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण गावाने पोफळी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध केली होती. यावेळी आमच्या कुटुंबियातील सदस्यांना संधी देणे सहज शक्य होते. मात्र, साळवी कुटूंबियांनी गाव व कार्यकर्त्यांच्या शब्दाखातर ते टाळले. या सर्व घडामोडीवरून आम्ही मक्तेदारी कुठे राखली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आम्ही निवडणुकीपुरते पोफळी जिल्हा परिषद गटात फिरत नाहीत. तर गेली काही वर्ष साळवी कुटूंबीय या गटातील विकासात्मक प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आले आहेत. यामुळेच आम्हाला जनतेकडून आदर मिळत आहे व आम्ही देखील तितकाच जनतेचा सन्मानदेखील राखतो.शिरगाव गणातून महिला कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी आमची इच्छा होती. मात्र पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे आपण महिला बचत गटांचे नेतृत्व करीत असून आपल्याला महिलांच्या अडीअडचणींची जाणीव आहे. तसेच शिरगाव गणात देखील जनसंपर्क दांडगा सातत्याने आहे. पोफळी सरपंचपद भूषवले असल्याने आपल्याला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. यामुळे आपला शिरगाव गणातून विजय हमखास होईल, असा विश्वास सौ. स्नेहा साळवी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या प्रचारासाठी अथक मेहनत घेत आहेत. याचबरोबर आमदार शेखर निकम यांनी शिरगाव जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळेच शिरगाव जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, असे सौ. स्नेहा साळवी यांनी आत्मविश्वासपूर्वक नमूद केले.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤 सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
