चिपळूण : संत गाडगेबाबा यांची 150 वी जयंती व 13 वा जिल्हा परिट समाज स्नेह मेळावा सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी चिपळूण येथील पेठमाप परीट आळी श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर सभागृहात जिल्हाध्यक्ष पत्रकार श्री. सुभाष अनंत कदम यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे.
स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांची 150 वी जयंती साजरी होत असल्याने या सोमवारी सकाळी 9. 45 वाजता पेठमाप परीट आळी येथे प्रभात फेरी, सकाळी 10.30 वाजता महिला जिल्हाध्यक्ष सौ. अंजली अनंत पिंपळकर यांच्यातर्फे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सकाळी 11 वाजता जिल्हा मेळावा व गाडगेबाबा जयंती उत्सव, 11.15 मूर्तिपूजन, दीप प्रज्वलन, 11.30 वा. मान्यवरांचे स्वागत, 11.40 प्रास्ताविक, 11.50 जिल्हा उपाध्यक्ष वसंत पिंपळकर पुरस्कृत
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ,
12.15 वा. पुणे येथील प्रा. कचेश्वर राऊत व प्रा. विनायक होमकळस यांचे संत गाडगेबाबांच्या जीवनावर भाषण होईल. दुपारी 1 वा. कार्याध्यक्ष मनोज शिंदे व लॉंड्री अध्यक्ष महेश भोसले प्रयोजित लॉंड्री व्यवसायातील आधुनिक मशीन, सोल्युशन केमिकल्स, साडी रोल प्रेस या बाबत लॉंड्री व्यवसायिकासाठी खास मार्गदर्शन, सहभाग : ऊर्जा साडी रोलप्रेस – गौरव इंटरप्राइजेस नाशिक, श्रीमान सोल्युशन पुणे,
विमल एजन्सी कोल्हापूर प्रो. प्रा. मंदार गुरव यांचे मार्गदर्शन होईल. 1.30 वा. सर्व अध्यक्ष व सल्लागार यांचे मनोगत, 1.55 समारोप व आभार, 2.00 वाजता स्नेहभोजन असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व समाज बंधू-भगिनींनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन
संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
