शिरगाव ( निसार शेख ) : चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानची यात्रा बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न झाली यावेळी धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली यावेळी आमदार शेखर निकम ,ठाण्याचे नगरसेवक मनोज शिंदे विविध पक्षातील राजकीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यात्रा पार पडली..
शिरगाव, कुंभार्ली, पोफळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत. या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रा उत्सव बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न झाली.. देवीला अभिषेक व रुपी लावणे. देवींची पूजा व आरती, सकाळी लाट चढवणे, अन्नप्रसाद, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव, समर्थ रक्तपेढी डेरवण आणि महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मांड भरणे, लाट प्रदक्षिणा, पारंपारिक ढोल वाद्य, हरिपाठ,कबड्डीचा अंतिम सामना व बक्षीस समारंभ पार पडले तर रात्री मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक, नंतर वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला . भाविकांकरता चिपळूण डेपोतून खास यात्रेसाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली होती तर अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY