शिरगाव..चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाला आज बुधवारी जल्लोषात प्रारंभ झाला आहे.यानिमित्ताने कुंभार्ली येथे धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.तर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.
शिरगाव, कुंभार्ली, पोफळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत. या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रा उत्सव आज कुंभार्ली येथे संपन्न होत आहे. देवीला अभिषेक व रुपी लावणे, देवींची पूजा व आरती, सकाळी लाट चढवणे, अन्नप्रसाद, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव, समर्थ रक्तपेढी डेरवण आणि महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मांड भरणे, लाट प्रदक्षिणा, पारंपारिक ढोल वाद्य, हरिपाठ,असे कार्यक्रम झाले तर रात्री मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक, नंतर वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे.. भाविकांकरता चिपळूण डेपोतून खास यात्रेसाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली असून अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY