सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील अनिश्चितता व इराण युएस यांच्यातील तोडगा न निघाल्याने कमोडिटीतील साशंकता कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचांदीच्या स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये वाढ केल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीच्या दरात आज आणखी एक उच्चांक गाठला गेला आहे. चांदीने तर प्रथमच ९० डॉलर प्रति औंसची पातळी पार केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चांदी गेल्या दोन दिवसात २०००० पेक्षा अधिक उसळली असून सोन्यातही प्रति ग्रॅम दरात दोन दिवसात २००० रूपयांपेक्षा तुफान वाढ कायम राहिली आहे. जागतिक अशांततेत ईपीएफ गुंतवणूकीत प्राधान्य मिळत असताना भौतिक कमोडिटीतील मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. ‘गुडरिटर्न्स’ संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०९ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४३६२ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १३१६५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०७७२ रूपयांवर पोहोचले आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीत, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०९० रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १००० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८२० रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४३६२०, २२ कॅरेटसाठी १३१६५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०७७२० रूपयांवर गेला आहे.