सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) : सिंधुदुर्गातील आंबा व काजू पीक यावर्षीही धोक्यात आले असून येथील बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.उशिरापर्यंत पडलेला पाऊस आणि दाट धुक्याचा परिणाम पिकावर झाला आहे.
विशेष म्हणजे यंदा मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर आला होता; मात्र बदलत्या हवामानामुळे फळधारणा अत्यंत कमी झाली आहे.
आलेला मोहर करपून काळा पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे बागायतदार अडचणीत आले असून राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा आंबा व काजू उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY