मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांची सुरेलसुमधुर मैफल “ये जिंदगी उसी की है” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. ६ मार्च, २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहृ विलेपार्ले येथे संपन्न होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून प्राजक्ता सातर्डेकर, जय आजगावकर, सौम्या वर्मा, सुधाकर शानभाग आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून निवेदक म्हणून मंदार खराडे काम पाहत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून विलेपार्ले परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक सुमधुर मैफलची लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH