ठाणे( प्रतिनिधी ) : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. विविध कामगार संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने आणलेल्या नव्या कामगार कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या कायद्यामुळे अंबानी आणि अदानी यांसारख्या उद्योगपतींचा फायदा होईल, तर कामगारांना भविष्यात गुलाम बनवले जाईल, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच कामगारांच्या भवितव्यासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याचेही त्यांनी म्हटले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कथित ‘काळा कायदा’ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही तोडगा निघाला नसल्याने, येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY