पेण(प्रशांत पोतदार): पेण तालुक्यातील वडखळ पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपकार हॉटेलजवळ गुरुवारी सकाळी घडलेल्या साखळी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 35 हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत एका आरोपीला अटक करत मोठे यश मिळवले आहे.
या घटनेत सुलोचना रमेश भालेराव (वय 42, रा. मातोश्री एसटी स्टँड परिसर, पेण) या कामावर जाण्यासाठी उपकार हॉटेलपासून गोवा रोडकडे एकट्याच पायी जात असताना, समोरून मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना लक्ष्य केले. मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेली. घटनेनंतर पीडितेने वडखळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
