वेंगुर्ला अजय गडेकर
” लक्ष्मीपूजनदिनी प्रतिष्ठापना तर होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विसर्जन ” अशा अनोख्या परंपरेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपतीचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी संपन्न होत आहे. सकाळी विधिवत पूजन झाल्यानंतर दुपारी सत्यनारायण महापूजा, महाआरती संपन्न झाली असून भाविकांची दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. रात्री ११ वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (भाई कलिंगण) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. उभादांडा श्री गणपती मंदिर देवस्थान व ग्रामस्थांतर्फे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. गणपतीचे ‘ म्हामणे ‘ कार्यक्रम बुधवार 25 फेब्रुवारी रोजी व गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY