शिवसेना नेते ना.रामदासभाई कदम, दापोली मतदार सघांचे आमदार ना.योगेशदादा कदम व मागील पार पडलेल्या सर्व निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या समाजसेविका सौ.श्रेया वहिनी कदम यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास,मुंबई तसेच ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत,व कोळबांद्रे पंचायत समिती गणातील मतदारांनी दिलेली भक्कम साथ यावरच आपला विजय झाला असल्याचे मत दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती व कोळबांद्रे पंचायत समिती गणनातून नुकत्याच भरघोस मतांनी विजयी झालेल्या सदस्या सौ. ममता शिंदे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की दापोली मतदार संघात नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकास कामे शहरासहित वाडी वस्त्यांवर झाली आहेत. त्यामुळे निश्चितच मतदार राजा ना.योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर खुश आहे.याचाच एक भाग म्हणून निवडून जिंकणे सोपे झाले होते .आता ना.योगेशदादा कदम यांचे हात अधिक बळकट करण्याची जबाबदारी आम्ही निवडून आलेल्या उमेदवारांची आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी पंचायत समिती गणातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच जिथे महत्त्वाच्या समस्या आहेत तिथे प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याचेही यावेळी सौ. ममता शिंदे म्हणाल्या.

विकास ही न संपणारी बाब आहे तरीही, नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर आपण सर्वजण विश्वास ठेवून आहोत.याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे.त्यामुळे विकासाची चिंता नको विविध मार्गाने,विविध योजनेद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचवणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे असे सांगत,आपण विकासाला पर्यायाने नामदार योगेशदादा कदम यांना साथ द्या आणि मतदारसंघात विरोधकांवर मात करत शिवसेना पक्ष अधिक मजबूत करा असे आवाहन करत,मी जरी विजयी झाले असले तरी हा विजय माझ्या सर्वसामान्य कार्यकर्ताचा, महिला भगिनीचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH