चिपळूण दि 12
कोकण बंजारा सेवा संघाच्या वतीने रविवार दि 15 रोजी महाशिवरात्री दिवशी संत सेवालाल महाराज जयंती शहरातील उकताड येथे साजरी करण्यात येणार असून बंजारा समाजाचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम असल्याने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला आ शेखर निकम यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे
कर्नाटक येथून हजारो बांधव कोकणात रोजगारासाठी येत असतात तर शेकडो बांधव या ठिकाणी स्थायिक झाले आहेत असे सारे बांधव एकत्र येत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करतात बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सेवालाल महाराज यांची जयंती या वर्षी रविवार दि 15 फेब्रुवारी रोजी उक्ताड येथे गणपती मंदिर समोर असणाऱ्या मैदानात साजरी होणार असून जिल्ह्यातून हजारो बंजारा बांधव या ठिकाणी सहभागी होण्यासाठी येत असतात
सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाची सुरवात होणार असून संत सेवालाल महाराज यांची पूजा आणि आरती करण्यात येणार आहे त्या नंतर बंजारा भगिनींचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्या नंतर उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात येणार असून दुपारी महाप्रसाद होणार आहे
या कार्यक्रमला आ शेखर निकम नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कोकण बंजारा सेवा संघाचे जेष्ट मानसिंग राठोड, प्रकाश पवार,यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जयंतीची जय्यत तयारी केली आहे
चिपळूण मध्ये १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन
