मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, भारतीय जनता पक्षाने आपला गटनेता जाहीर केला आहे. तीन टर्मचे अनुभवी नगरसेवक आणि महापालिकेच्या कामकाजाचे सखोल ज्ञान असलेले गणेश खणकर यांची मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी गटनेतेपदी नियुक्तीची घोषणा केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (शिंदे गट) सोबतच्या महायुतीने (११८ जागा) बहुमत मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवक गटांची अधिकृत नोंदणी झाली. भाजपने स्वतंत्र गट नोंदवत गणेश खणकर यांना गटनेते म्हणून नियुक्त केले.

कोण आहेत गणेश खणकर ?
गणेश खणकर हे दहिसर (प्रभाग क्रमांक ७) मतदारसंघातून निवडून आलेले नगरसेवक आहेत. त्यांनी विनोद घोसाळकर यांच्या चिरंजीवाला पराभूत करून ही जागा जिंकली. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपशी एकनिष्ठ राहिले असून, पक्षाच्या संघटना उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
ते भाजपचे मुंबई महामंत्री म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. खणकर यांची विशेष ओळख म्हणजे मुंबई आणि उपनगरांतील टँकर माफियांविरोधात दिलेला प्रखर लढा. टँकर माफियाकडून होणारी पाण्याची लूट थांबवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणि जनजागृती केली.महापालिकेच्या विविध विषयांवर सखोल अभ्यास आणि अनुभव असल्याने ते अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात.

भाजप नगरसेवकांमध्ये आनंद
गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड झाल्याने भाजप नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप हा सर्वाधिक जागा असलेला पक्ष असल्याने, गटनेते म्हणून खणकर हे ‘हाऊस लीडर’ म्हणून काम करतील. महायुतीतील सत्ता वाटप आणि महापौरपदाबाबत चर्चा सुरू असून, भाजपकडून महापौर पदासाठी मजबूत उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY