मालवण : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. आज (बुधवार) सकाळी देवीचा हुकूम घेण्याची पारंपरिक प्रक्रिया पार पडल्यानंतर जत्रेची अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली.दरवर्षी या जत्रेला लाखो भाविकांची उपस्थिती असते. यंदाही सुमारे दहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.