लांजा : लांजा राजापूर मतदार संघाचे सन्माननीय आमदार श्री. किरण उर्फ भैय्या सामंत यांनी बँकेला सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र अर्बन बॅंक्स फेडरेशनचा 301 ते 500 कोटी ठेवी असणाऱ्या बँकांमधून “सर्वोत्कृष्ट बँक ” पुरस्कार मिळाल्या निमित्ताने अभिनंदन करण्यासाठी भेट दिली. त्यांच्या बँकेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय खातू, नगरध्यक्ष श्री. उमेश सकपाळ,चिपळूणचे प्रांत श्री. आकाश लिगडे, उपनिरीक्षक श्री. बेले साहेब , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. अण्णा कदम, तालुकाप्रमुख श्री. दिलीप जाधव, श्री. सचिन कदम,उद्योजक श्री. पिंट्याशेठ पाकळे, शिवसेना सर्व नगरसेवक, श्री. भरत शेठ गांगण, श्री. रमेश खळे पक्षाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे कोअर कमिटी सदस्य श्री. उमेशशेठ काटकर, श्री. निहारशेठ गुढेकर, श्री. समीर जनावलकर, श्री. मिलिंदशेठ कापडी, श्री. रत्नदीप देवळेकर, श्री. सुनिल खेडेकर, माजी संचालक श्री. सतीश अप्पा खेडेकर संचालक श्री. विराज दळी , चिफ ऑफिसर श्री. अरविंद भागडे व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.