खेड : मनोज जरांगे पाटील हे कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.
. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकवूनही दाखवलं. त्यामुळे त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे केवळ बदनामी करण्याच्या हेतूने केले जात असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे. ऑडिओ क्लिप समोर आणून एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची पातळी खाली आणली असल्याची टीकाही कदम यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.