चिपळूण: शहर आणि ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबूत करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देणारे नेते प्रशांत यादव यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला.
भाजप नेते प्रशांत यादव यांनी अल्पावधीत तळागाळापर्यंत पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवली आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. शहरा प्रमाणेच ग्रामीण भागात त्यांनी पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. त्यामुळे चिपळूण नगर पालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला लक्षणीय यश प्राप्त झाले. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण यांनी श्री यादव याना रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले.
आज शिवजयंतीच्या शुभ पर्वावर श्री यादव यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात आणि सोबत घेऊन प्रामाणिकपणे पार पाडू अशी प्रतिक्रिया श्री यादव यांनी व्यक्त केली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY