महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही अंतिम मुदतवाढ असून शाळांनी शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी अर्ज या कालावधीत पूर्ण करावेत, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.
विलंब शुल्कासह अर्जाची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025,
अतिविलंब शुल्क : 24 ते 27 डिसेंबर 2025,
अतिविशेष विलंब शुल्क : 28 ते 31 डिसेंबर 2025.
31 डिसेंबर 2025 नंतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे.
