नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी विशेष मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, मुळव्याध, हायड्रोसिल, चरबीच्या गाठी, थायरॉईड, फिशर, मुतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट ग्रंथी, टॉन्सिल, कानाच्या पडद्याचे ऑपरेशन, नाकाच्या हाड वाढीची शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, हिप जॉइंट रिप्लेसमेंट (खुबे बदलणे) तसेच महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड आवश्यक असून, भूलतज्ञांकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे.

शिबिराची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. सचिन धुमाळ (9272897834), श्री. संकेत जांभळे (9922566639) आणि श्री. संदीप पाटील (9209165041) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.