चिपळूण : चिपळूण येथे ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा उत्साह निर्माण करणारा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला, जेव्हा अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी Renault ने आपल्या अत्यंत लोकप्रिय SUV मॉडेल Renault Duster चे नव्या रूपात भव्य लोकार्पण केले. “The Icon is Back” या प्रभावी घोषवाक्याखाली पार पडलेला हा सोहळा उत्साह, दिमाख आणि आधुनिकतेचा संगम ठरला.
एम.आय.डी.सी. खेर्डी, चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम यांच्या आणि भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व वाशिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन प्रशांतजी यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
तसेच या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते, माजी आमदार श्री. सदानंदजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयेंद्रथशेठ खताते, चिपळूण पंचायत समितीचे उपसभापती संदेशजी आयरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य नितीनजी ठसाळे, माजी सरपंच दशरथशेठ दाभोळकर, खेर्डीचे उपसरपंच अभिजीत खताते, ग्रामपंचायत सदस्य राकेशजी दाभोळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात Renault चे सेल्स मॅनेजर श्री. सतीशजी पवार तसेच कोल्हापूरचे सेल्स हेड श्री.मंदारजी कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान केला.
यावेळी नवीन Renault Duster चे अनावरण अत्यंत दिमाखदार वातावरणात करण्यात आले. आकर्षक लाईटिंग, दमदार संगीत आणि टाळ्यांच्या गजरात उलगडलेला हा क्षण उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
नवीन डस्टर ही केवळ एक SUV नसून, स्टाईल, परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिपूर्ण संगम असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. दमदार एक्सटेरियर डिझाइन, आधुनिक इंटीरियर, स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स, शक्तिशाली इंजिन आणि प्रगत सुरक्षा प्रणाली यामुळे ही गाडी भारतीय ग्राहकांसाठी विश्वासार्ह आणि आकर्षक पर्याय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या विशेष प्रसंगी गाडीचे आधीच बुकिंग केलेल्या ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊब आणि आत्मीयता लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोलजी टाकळे यांनी प्रभावी आणि ओघवत्या शैलीत करून उपस्थितांची मने जिंकली.
शेवटी, उपस्थित मान्यवर व नागरिकांनी नवीन Renault Duster च्या पुनरागमनाचे स्वागत करत, हा मॉडेल बाजारपेठेत निश्चितच मोठे यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.
न्यू डस्टर दमदार पुनरागमनाचा भव्य सोहळा चिपळूणमध्ये संपन्न “The Icon is Back”
