रोहा ( प्रतिनिधी  ) रोहा नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजीत पवार गट ) ची एकहाती सत्ता असून नगर पालिकेतील विविध खात्यातील समिती सभापतीपदासाठी निवडणुका बिनविरोध पार पडल्या.या निवडणुकीत ४जुन्या व अनुभवी  नगरसेवकांसमवेत नवीन ३ चेहऱ्यांना देखील सभापती व उपसभापतीपदावर काम करण्याची संधी देण्यात आली.

   रोहा नगर पालिकेच्या बांधकाम व अपंग कल्याण समिती सभापती राजेंद्र जैन, पर्यटन, पर्यावरण व नियोजन समिती सभापती महेश कोल्हटकर, पाणी पुरवठा दिवाबत्ती समिती सभापती महेंद्र दिवेकर,  सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापती अहमद दर्जी जुन्या आणि अनुभवी नगरसेवक मंडळींसोबत प्रथमच निवडून आलेले रवींद्र चाळके यांना शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण समिती सभापती तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. निता हजारे व उप सभापती सौ.गौरी बारटक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.प्रत्येक समितीत इतर ३ नगरसेवकांची समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आम. अनिकेत तटकरे, शहर अध्यक्ष अमित उकडे,नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे, गट नेते महेंद्र गुजर पक्षाचे पदाधिकारी व सर्व आजी माजी नगरसेवकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या…

.

1) अहमद दर्जी,   2 ) रवींद्र चाळके,

3)महेश कोल्हटकर   4) राजेंद्र जैन,

5 ) निता  हजारे   6) महेंद्र दिवेकर 

————-

सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY