नागोठणे ( वार्ताहर ) : नागोठणे मोहल्ल्यातील काही तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून शिवसेनेचे नागोठणे गटातील उमेदवार सुमित काते यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मोहल्ला भागात शिवसेनेची ताकद हळूहळू वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मोहल्ल्यातील शोएब सय्यद, मुश्ताक सय्यद, तुफील कडवेकर, शोएब कडवेकर यांचा समावेश असून या सर्वांनी शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी शिवसेना पक्षाच्या कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते व शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी शिवसेना नागोठणे विभाग संघटक दिनेश घाग, वजरोली शाखा प्रमुख शैलेश कासार, शिवसेना कार्यकर्ते बाळाराम पोटे, बाबू घाग, फैयाज सय्यद आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांनी स्वागत केले आणि त्यांना पक्षात योग्य तो मानसन्मान मिळेल याची ग्वाही दिली.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
