लांजा (गोविंद चव्हाण) : सामाजिक कार्याचा आढावा गेली 30 वर्ष आपला नीट नेटका संसार सांभाळून निकिता जाधव यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. निःस्वार्थ प्रामाणिक समाजसेवेचा वसा घेऊन अनेक समजोपायोगी कामे त्यांनी या 30 वर्षात नीटनेटके पणाने पार पाडली.
रत्नागिरी मध्ये घरकाम करणार्यां महिलांसाठी त्यांनी व्यासपीठ निर्माण केले. महिन्याच्या 1 तारखेला सर्वांची सभा घेऊन त्यांच्या अडचणी सोडवू लागल्या. वोटिंग कार्ड असो बर रेशन कार्ड, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असो वा ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत असो, आपल्या घरातील सदस्य समजून त्या मदत करत राहिल्या. समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, महिलांची तज्ञ् महिला वैद्यकीय अधिकारि कडून संपूर्ण चेकअप अशी आरोग्य क्षेत्रात भरीव सामाजिक कार्य केले. 12 वर्ष मोफत वधुवर मेळावे घेऊन शेकडो मुलामुलींची लग्न जुळवली.

त्याच बरोबर गरजू व गरीब मुलींची लग्नाची जबाबदारी घेऊन रीतसर लग्न हि लावून दिली. घटस्फ़ोटच्या उंब्र्यावर येऊन पोचलेल्या अनेक संसारांना सावरून त्यांना समुपदेशन चा मार्ग अवलंबून योग्य मार्गकडे नेले. टिन टिन प्लेस्कुल च्या माध्यमातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना माफक दरात दर्जेदार शिक्षण प्रदान केले. कोरोना काळात गरजून्ना अन्न व राशन यथाशक्ती पुरवले. मात्र कुठेही स्वतःचा फोटो झलकवला नाही. कुणा महिला अथवा मुलीवर अत्याचार किंवा अन्याय होत असल्यास अन्याया विरुद्ध आवाज उठवून सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्यास सर्वोतॊपरी मदत केली.